बौलीवूडचा हिंदू फोबीया- सुशांत सिंगच्या निमित्ताने प्रा.विनायक आंबेकर

1 min read

बौलीवूडचा हिंदू फोबीया- सुशांत सिंगच्या निमित्ताने प्रा.विनायक आंबेकर

सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येच्या निमित्ताने पुन्हा एकदा बौलीवूड मध्ये काही विशिष्ट खास फॅमिली आणि त्यांच्या माफिया गटाचे वर्चस्व असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. हा गट त्यांच्या सर्कल बाहेरच्या व्यक्तींवर  मानसिक दबाव टाकून त्याला स्पर्धेतून बाहेर करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या मुलाना फिल्म जगतात स्पर्धा निर्माण होऊ नये असा प्रयत्न करतो हे आपल्या सारख्या सामान्य प्रेक्षकाला देखील कळते. या क्षेत्रात सेलेब्रिटी किड्स कसे फटाफट पुढे आणले जातात ते आपण नेहमी पहातो पण मानवी स्वभावाचा भाग म्हणून आपण ते सहज स्वीकारतो देखील. पण त्याही पुढे जाऊन जर ही टोळी जर सुशांत राजपूत सारख्या स्वकष्टाने आणि प्रतिभेने यशस्वी झालेल्या उत्तम कलाकाराला जगणे मुश्किल करून टाकत असेल तर सिने रसिकांनी आणि सर्व समाजाने याची दखल घेणे आवश्यक झाले आहे हे निश्चित.

या दोन दिवसात फिल्म जगातल्या काही व्यक्तींनी तसे स्पष्ट आरोप केले आहेत. बिनधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध कंगणा राणावतने एक व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे शेअर करून सुशांतने आत्महत्या केली नसून फिल्म जगाने म्हणजेच या माफिया टोळीने त्याची हत्या केली ( आत्महत्येला भाग पाडल्याचा) असा  स्पष्ट आरोप केला आहे. गल्ली बॉय या टुकार सिनेमाला सर्व पारितोषीके दिली कारण त्यात रणविर सिंग, आलिया भट या सारख्या सेलेब्रिटी किड्सना प्रसिद्धी द्यायची होती पण त्या  अवार्ड मध्ये सुशांतच्या धोनी, छिचोरे, केदारनाथ या सारख्या चांगल्या फिल्मचा साधा उल्लेख देखील केला गेला नाही असा तिचा आरोप आहे. अभिनव सिंग कश्यप या दबंगच्या निर्मात्याने सलमान खान, अरबाज खान आणि सोहेल खान या खान कुटुंबावर त्याचे नंतरचे सर्व प्रोजेक्ट हाणून पाडण्याचा स्पष्ट आरोप करून त्याला खुनाच्या आणि त्याच्या कुटुंबातील महिलांवर बलात्कार करण्याच्या धमक्या दिल्याचा देखील आरोप केला आहे. अनुभव सिन्हा या निर्मात्याने या खास माफिया क्लबला आज रात्री नीट विचार करा आणि ( आपल्यात सुधारणा करा) असा सल्ला दिला आहे.  विवेक ओबेरॉयने देखील या सिने वर्तुळातील खास माफिया क्लबवर नवीन कलाकारांना प्रगति करूदेत नाहीत असा आरोप केला आहे.

गेल्या काही दशकातील बॉलीवूड मधील आघाडीच्या कलाकारांची, संगीतकारांची, निर्मात्यांची, दिग्दर्शकांची नावे घेतली तरी समोर येणारी नावे विशिष्ट आहेत हे लक्षात येते. पूर्वी प्रेक्षकाना फसवण्यासाठी नावे बदलण्याची प्रथा होती. त्यामुळे मोहमद युसुफ खान ( दिलीप कुमार ), हमेद अली खान ( अजित ), बद्दरुद्दीन खान ( जॉनी वौकर), सययद अहमद जाफरी ( जयदीप )हे नावे बदलून वावरायचे. नंतरच्या काळात स्वत:चे खरे नाव लावायला लागल्यावर जी गोष्ट समोर येते ती फार वेगळी आहे. केवळ हिरो पहायचे झाले तर फिरोज खान,सलीम खान,सलमान खान, अमीर खान, शाहरुख खान,  सईफ अली खान, फरदीन खान, इरफान खान,फैजल खान, शादाब खान, शहबाज खान, आजाज खान, सर्फराज खान, शाहनवाज खान,अरबाज खान, सोहाइल खान  एव्हढे खान समोर येतात शिवाय नसरूददिन, जावेद अख्तर वै वेगळे आहेतच . हीच गोष्ट दिग्दर्शक, निर्माते, गीतकार, संगीत कार या बाबतीत देखील आढळते. आता हा सर्व योगायोग आहे असे म्हणणे सोपे आणि सोईचे असेलही पण खरे निश्चित नाही. त्यामुळे बौलीवूडवर बराच काळ विशिष्ट वर्गाचा कब्जा होता हे स्पष्ट आहे. त्या काळात निर्मिती,कथा, गाणी, संगीत, हीरो हिरोईन,कोरेओग्राफी पासून ते फिल्म डिस्ट्रिब्युशन पर्यन्त सर्व काही याच लोकांच्या ताब्यात होते आणि त्यांना दुबईवरुन दावूदचे प्रोटेक्शन आणि अर्थसहाय्य होते. टी सिरिजने चित्रपट व संगीत डिस्ट्रिब्युशन मध्ये आपला जम बसवायला सुरुवात केल्यावर त्याच्या मालकांची  भरदिवसा शंकराचे दर्शन करून मंदीरा बाहेर पडल्यावर हत्या करण्यात आली होती हे त्याचे ठळक उदाहरण आहे.  या काळातही कपूर घराणे आपल्या कलागुणामुळे टिकून राहिले आणि अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, धर्मेंद्र सारखे कलाकार लोकप्रिय झाले हे खरे असले तरी त्यांना याच प्रकारच्या दबावाना नक्कीच तोंड द्यावे लागले असणार.

दुबईचा करिश्मा कमी झाल्यावर नवीन ईतर कलाकार पुढे येण्याचे प्रमाण वाढत गेले. नाना पाटेकर, माधुरी दिक्षित, रितेष देशमुख सारख्या मराठी कलाकारांसह अनेक परप्रांतीय कलाकार स्वकर्तुत्वाने प्रसिद्ध झाले. दहशत कमी होत चाललेय असे पाहिल्यावर  मग या माफियाने हिंदुत्व विरोधी भूमिका घेण्यास सुरुवात केली. कोणताही सिनेमा काढताना त्यात हिंदू देवदेवतांची विडंबना सर्रास दाखवली जाऊ लागली. हिंदू परंपरा, हिंदू संस्कार याची खिल्ली उडवणे सुरू झाले. जावेद अख्तर, महेश भट्ट, शबाना आझमी हे नवे सेक्युलर चेहरे सतत हिंदुत्व विरोधी विखारी प्रचार करू लागले. या नंतर छुपा दबाव टाकण्याचा प्रकार सुद्धा सुरू झाला. सुशांत राजपूतने ” मी हिंदू धर्मात जन्माला आलो त्याचे मला वाईट वाटते” हे वाक्य म्हणणे  किंवा आपला पिक्चर रिलीज होण्याच्या आदल्या दिवशी दीपिका पादुकोणने दिल्लीच्या जे एन यू मध्ये सीएए विरुद्धच्या आंदोलनात हजेरी लावणे या गोष्टी माफियाच्या दबावाखाली असाव्या असे वाटते. अनुपम खेर यांना या माफियाशी सतत द्यावा लागत असलेला लढा  आपण समजावून घेतला पाहिजे.

थोडक्यात या माफियाशी आपण जनतेने लढा देणे आज गरजेचे झाले आहे. अक्षय कुमार, अजय देवगण या सारख्या अनुभवी आणि सुशांत च्या पीढीतील नवोदित हीरो आणि कंगणा रानावत सारख्या हिरोईनला आपण सर्वांनी त्यांचे पिक्चर यशस्वी करण्यास मदत केलीच पाहिजे. शिवाय या लोकांची लोकप्रियता वाढेल या साठी सोशल मीडियावर प्रयत्न केले पाहिजेत. हिंदुफोबिक बॉलीवूडला आपल्या कृतीतून चपराक मारली पाहिजे हे आपण लक्षात घ्या आणि करा ही विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *