इथर (अक्ष/आकाश) : वैश्विक ज्ञानाचा स्त्रोत!

1 min read

इथर (अक्ष/आकाश) : वैश्विक ज्ञानाचा स्त्रोत!

सनातन हिंदू धर्मातील वेदात सृष्टीचे ज्ञान सामावलेलं आहे. हे ज्ञान मानवाला परब्रह्म कडून मिळालेलं आहे अस मानल जात. परब्रह्म हा कोणी मानव नसून, एक जागृत शक्ती आहे. या शक्तीने त्याकाळच्या ऋषींना हे ज्ञान दिले. नंतर, त्या ऋषींनी सदर ज्ञान श्रुतीच्या माध्यमातून पिढी दर पिढी पुढे नेले. यावर, एक प्रश्न पडतो कि परब्रह्म कडून या ऋषींनी सगळ ज्ञान कसे आणि कुठून घेतले असेल?

याच उत्तर आहे, अक्ष रेकॉर्ड (किवा Ether) या माध्यमातून!

आकाश, इथर किवा संपूर्ण विश्वात ग्रह ताऱ्यामध्ये जे निर्वात पोकळी आहे त्यातील पदार्थ म्हणजे अक्ष आहे. याच अक्षला ब्रह्म देखील म्हटले गेले आहे.

छांदोग्य उपनिषदात नारदमुनी आणि सनतकुमार यांच्यातील चर्चेत दोन श्लोक आहेत, त्यात अक्षच (इथर) वर्णन दिलेलं आहे.

आकाशो वाव तेजसो भूयानाकाशे वै सूर्याचन्द्रमसावुभौ

विद्युन्नक्षत्राण्यग्निराकाशेनाह्वयत्याकाशेन

शृणोत्याकाशेन प्रतिशृणोत्याकाशे रमत आकाशे न रमते

आकाशे जायते आकाशमभिजायत आकाशमुपास्स्वेति ||७.१२.१||

अर्थ (भाष्य) : सूर्य,चंद्र, तारे, प्रकाश आणि इतर साऱ्या गोष्टी या अक्ष (इथर) मधून आलेल्या आहे. आपल्याला अक्ष मुळे ऐकू येते. प्रतिध्वनी अक्ष मुळे उमटतो. आपले आनंद, आपले दु:ख अक्ष मुळे आहेत. कुठल्याही पदार्थाच अस्तित्व अक्ष शिवाय असूच शकत नाही. पदार्थांच अस्तित्वच नसेल तर आपल्या कडून त्याविषयी कुठल्याही प्रतिक्रिया (आनंद किवा दु:ख) जाऊ शकत नाही. सृष्टीतील प्रत्येक जीव अक्ष मुळे जगत आहे. इतकच काय, तर झाडे सुद्धा अक्ष मुळे वाढतात. म्हणजे, अक्ष सर्वत्र आहे. पुढे सनतकुमार म्हणतात, “हे नारदा, या अक्षाच्या पलीकडे अनंत आकाश, अनंत अवकाश आहे, ज्याचा तू ध्यानधारणेसाठी उपयोग करू शकतो.”

स य आकाशं ब्रह्मेत्युपास्त आकाशवतो वै स

लोकान्प्रकाशवतोऽसंबाधानुरुगायवतोऽभिसिध्यति

यावदाकाशस्य गतं तत्रास्य यथाकामचारो भवति

य आकाशं ब्रह्मेत्युपास्तेऽस्ति भगव आकाशाद्भूय इति

आकाशाद्वाव भूयोऽस्तीति तन्मे भगवान्ब्रवीत्विति ||७.१२.२||

अर्थ (भाष्य) : नारद विचारतात ” मान्य आहे कि अक्ष हि अतिदिव्य गोष्ट आहे. मी सुद्धा अक्षाशिवाय दुसरी कुठलीच गोष्ट विचार करू शकत नाही. पण, अक्ष म्हणजेच पूर्णसत्य आहे का? कि अक्षाच्या पलीकडेही अजून काही भव्यदिव्य गोष्ट आहे?” यावर सनतकुमार उत्तर देतात, “हो, अक्षापलीकडेही काहीतरी आहे आणि ते जे काही आहे, ते अक्षही आत्मसात करू शकत नाही. त्याच्या शिवाय अक्ष असूच शकत नाही. अशी ती असीम शक्ती आहे, ब्रह्म!!!!”

 

इथर (म्हणजे अक्ष किवा आकाश) सिद्धांत आजच्या विज्ञानात न्यूटन (इस १७१८) ने लिहिलेल्या “Opticks” या पुस्तकात चर्चिला गेला आहे. त्यानंतर युरोपातील प्रत्येक शास्त्रज्ञ इथर (किवा Luminiferous Ether) यावर चर्चा करू लागला. त्यांच्या मान्यतानुसार, ‘इथर म्हणजे प्रकाश किवा चुंबकीय लहरींना वाहून नेण्याचे एक माध्यम आहे. इथर हा पदार्थ सगळ्या विश्व व्यापून आहे. पृथ्वी, सूर्य, तारे याच माध्यमात तरंगत आहे. हे इथर माध्यम विरळ आणि घनदाट होते, ज्यामुळे, प्रकाश सरळ बिंदूत न जाता त्यातून वक्र होतो’.

मानवाला इथर किवा अक्षतून ईश्वरीय ज्ञान मिळाले आहे हि गोष्टच काही नास्तिक शास्त्रज्ञाच्या पचनी पडत नव्हती. त्यांनी इथर संकल्पनाच खोटी आहे हे दाखवण्याच्या चंगच बांधला. त्यासाठी Albert Michelson या यहुदी नास्तिक शास्त्रज्ञाने आपल्या Morle या सहकार्यासोबत एक प्रयोग केला. तो प्रयोग Michelson–Morley experiment (इस १८८७)  या नावाने प्रसिद्ध आहे.

या प्रयोगात, त्यांनी एक प्रकाश देण्यासाठी monochrome light source घेतला. त्यातून निघणारा प्रकाश एका light Beam Deflector मधून सोडला. त्यांनी एक आरसा deflector च्या रांगेत ठेवला आणि दुसरा आरसा deflector च्या डाव्या बाजूला ९० अंश कोनात ठेवला. तसेच, एक light detector,  deflector च्या उजव्या बाजूला ९० अंश कोनात ठेवला. light Beam Deflector मधून प्रकाशलहर (light wave) समोरच्या आरशावरून परावर्तीत होऊन light detector वर आदळते. त्याच वेळेस ९० अंशात ठेवलेल्या आरशातून दुसरी प्रकाशलहर परावर्तीत होऊन, light Beam Deflector मधून light detector वर आदळते. हे सगळे उपकरणे त्यांनी एका फिरत्या platform वर ठेवली होती. त्यांच्या विचारानुसार, इथर पृथ्वीच्या पृष्ठभागाशी समांतर असेल.

त्याचा विचार होता कि जसा platform फिरेल, तसे इथर मुळे एक लहर हळू होईल आणि दुसरी जलद होईल. या लहर (wave) गतीच्या बदलामुळे दोन्ही लहरीत interference होऊन light detector वर एक pattern निर्माण होईल. यात काही प्रकाशित भाग (constructive Interference) असेल तर दुसरा अप्रकाशित भाग (destructive Interference) असेल. आणि, दोन्ही लहरीच्या वेळेतला फरक हा पृथ्वीची फिरण्याची गती दर्शवेल. हि गती ३० km/s असते. पण, त्यांना लहरीच्या वेळेत असा काही फरक मिळाला नाही. यावरून, त्यांनी निष्कर्ष काढला कि इथरच काहींही अस्तित्व नाही.

पण, त्याच वेळेस असाही निष्कर्ष निघत होता कि पृथ्वी स्थिर आहे. जो, शास्त्रीय जगतात धक्कादायक मानला गेला. त्याच वेळेस प्रश्न विचारला गेला कि मग सूर्यापासून प्रकाश पृथ्वीवर पोहोचतो कसा?

या प्रश्नाच उत्तरासाठी आणि Michelson–Morley यांच्या थेयरीला पाठिंबा देण्यासाठी आल्बर्ट आईनस्टीन ने Special Relativity ची संकल्पना मांडली. त्यांच्या थेयरी नुसार, प्रकाशाच वहन होण्यासाठी कुठल्याही माध्यमाची आवश्यकता नाही. आईनस्टीनच्या या थेयरीने इथरच अस्तित्वच संपुष्टात आणल. Michelson–Morley प्रयोगाने अमान्य केलेलं इथरच अस्तित्व १०० वर्ष टिकून होत.

ऑगस्ट १९८६ USA Air force ने हाच प्रयोग थोड्या वेगळ्या पद्धतीने केला आणि advance साधनं वापरून, त्यांनी इथरच अस्तित्व आहे अस सिद्ध केल. त्याबद्दल केलेलं संशोधन त्यांनी Nature या जगप्रसिद्ध नियतकालकात प्रकाशित केले. त्यात त्यांनी फक्त platform ला पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या ९० अंश कोनात फिरवले. त्यामुळे, त्यांना हवे ते interference pattern देखील मिळाले. त्यावरून निष्कर्ष अस निघतो कि इथरची दिशा पृथ्वीच्या पृष्ठभागाशी समांतर नसून, पृष्ठभागाशी काटकोनात आहे. यावरून, आईनस्टीन Special Relativity खोटी ठरवली गेली.

 

एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, Georges Sagnac या शास्त्रज्ञाने १९१३ सालीच थोडा वेगळा प्रयोग करून इथरच  अस्तित्व सिद्ध केल होत. पण, त्यांची कोणीच दाखल घेतली नाही. आज Sagnac Effect विमानात, विमान वळवताना दिशा दर्शवण्यासाठी वापरला जातो.

निकोला टेस्टला आणि इथर

निकोला टेस्टला यांना इथरच अस्तित्व मान्य होत. इथर (अक्ष) आणि ‘प्राण’ या उपनिषेदातील व्याख्या  स्वामी विवेकानंदानी त्यांना समजावून दिल्या होत्या. त्याबद्दल त्यांनी १९०७ साली एक लेख लिहिला होता. त्याच नाव होत Man’s Greatest Achievement. या लेखात त्यांनी इथर आणि प्राण याबद्दल खालील गोष्टी लिहिल्या,

”  Long ago… [mankind] recognized that all perceptible matter comes from a primary substance, or tenuity beyond conception, filling all space, the Akasha or Luminiferous ether, which is acted upon by the life giving Prana or creative force, calling into existence, in never ending cycles all things and phenomena. The primary substance, thrown into infinitesimal whirls of prodigious velocity, becomes gross matter; the force subsiding, the motion ceases and matter disappears, reverting to the primary substance. ”

आपल्या शेवटच्या काळात टेस्टला anti-gravity वर काम करत होते. तेव्हा त्यांनी दावा केला होता कि त्याच्या anti-gravity यानाला इथर मधून अक्षय उर्जा मिळू शकते. पण, दुर्दैवाने त्याचा हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. टेस्टला यांचा अजून एक महत्वाकांशी प्रकल्प म्हणजे Wardenclyffe Tower. या tower द्वारे टेस्टला wireless power देवू इच्छित होते. या tower द्वारे कमी frequency आणि जास्त voltage सिग्नल पाठवले जात. हे सिग्नल Ionosphere ( पृथ्वीपासून ८५ किमी ते ६०० किमी दूर असलेले क्षेत्र) मधून जात होते. याच क्षेत्रात अक्षिक रेकॉर्ड आहे अस मानल जात. याचा अर्थ सरळ आहे, कि एकदा अक्षिक रेकॉर्ड मध्ये घुसखोरी करता आली तर मानवाला मिळालेल्या प्राचीन ज्ञान पुन्हा ताब्यात घेता येईल. पण, जर यावर वाईट लोकांचा अधिकार झाला तर मानवजात धोक्यात येऊ शकते. पण, काही कारणास्तव (मुख्यत: आर्थिक) हा प्रकल्प बंद करण्यात आला. या प्रकल्पासाठी आर्थिक पाठबळ पुरवणारे J P Morgan (आज त्यांच्या नावाची मोठी बँक आहे) यांनी प्रकल्पाची आर्थिक मदत बंद केली. लोकांसमोर आलेल कारण काहीही असो, पण, कदाचित टेस्टलाना या प्रकल्पाच्या गैरवापराची कल्पना आली असावी म्हणून त्यांनीच हा प्रकल्प बंद केला असावा.

आतापर्यंत विज्ञानाला फक्त चार बल माहित होते, गुरुत्व, विद्युतचुंबकीय, सबल(strong) आणि दुर्बल(weak) परमाणु बल. पण, आताच झालेल्या संशोधनात, अजून पाचवा बल आहे हे सिद्ध झाले आहे. हे नवीन बल फक्त इलेक्ट्रोन आणि neutron वरच कार्य करत. हे बल इथर मध्ये असलेल्या कृष्णपदार्थ (dark matter) चा भाग आहे.

यावरून दिसून येते कि, आपण अक्ष (इथर किवा ब्रह्म) ला अजूनही पूर्णपणे समजू शकलो नाही. प्राचीन काळी स्वयंभू मनू महर्षीने आपल्या असीम शक्ती द्वारे इथर मधून वेदांचे ज्ञान प्राप्त केले होते असे म्हटले जाते. त्यांनी ते कसे मिळवले? हे आजच्या विज्ञानाला कदाचित सांगता येणार नाही. कोण जाणे, ते Superman देखील असू शकतात किवा Alien!

विज्ञान शक्यता नाकारत नाही.  जयतु भारतम || वंदे मातरम ||

ले. : नंदलाल गवळी

संदर्भ :

१. http://www-history.mcs.st-andrews.ac.uk/Extras/Einstein_ether.html

२.https://www.ancient-code.com/nikola-tesla-ether-antigravity-and-harnessing-the-power-of-the-universe/

३. https://www.swami-krishnananda.org/chhand/Chhandogya_Upanishad.pdf

४. https://swarajyamag.com/books/the-connection-between-vivekananda-tesla-and-the-akashic-field

५. https://news.uci.edu/2016/08/15/uci-physicists-confirm-possible-discovery-of-fifth-force-of-nature/

६. https://www.quora.com/What-is-the-meaning-and-origin-of-the-name-Akash

७. https://en.wikipedia.org/wiki/Aether_theories

८. https://en.wikipedia.org/wiki/Michelson-Morley_experiment

९. https://www.youtube.com/watch?v=F2m_VZJM0Zc

१०. https://www.youtube.com/watch?v=BkzMuU6jnGk

११. https://www.youtube.com/watch?v=uFm794Dld_8

Disclaimer : या लेखात व्यक्त झालेली मते हि सदर लेखकाची व्यक्तिगत मते आहेत.

====  +  ====

 

1 thought on “इथर (अक्ष/आकाश) : वैश्विक ज्ञानाचा स्त्रोत!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *