आंबेडकरवादी नवबौद्ध मित्रांना एक अनावृत्त पत्र ले. सुजित भोगले

1 min read

Opinion

आंबेडकरवादी नवबौद्ध मित्रांना एक अनावृत्त पत्र ले. सुजित भोगले

डॉक्टर आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारताना आपल्या अनुयायी मंडळींना २२ प्रतिज्ञा दिल्या. त्याचा उद्देश हा होता की त्यांच्या अनुयायी मंडळींनी हिंदू धर्माशी असलेली त्यांची नाळ पूर्ण तोडून टाकावी. त्या साठी गणपतीची पूजा करू नका. ब्राह्मणाला विधी करायला बोलावू नका या सगळ्या गोष्टी या प्रतिज्ञेत स्पष्टपणे सांगितल्या आहेत. याचे पालन केल्याने आंबेडकरांचे अनुयायी एक समूह बनवण्यात यशस्वी होतील, एक रहातील आणि स्वतःचा विकास साधतील हा हेतू होता.  हा संदेश देतांना आंबेडकर यांना बुद्ध धम्माच्या मूळ तत्वांच्या मध्ये या पैकी काहीही समाविष्ट नाही याची पूर्ण कल्पना होती. परंतु आपद्धर्म म्हणून त्यांनी असा संकीर्ण वाटणारा संदेश दिला.

या संदेशाच्या मागील भावार्थ समजून घ्या. हिंदू धर्माचे सहाय्य घेऊ नका. आधार घेऊ नका. बुद्ध होऊन स्वयंप्रज्ञेने उभे रहा. हा संदेश आत्मसात करा. परंतु बाबासाहेबांनी कुठेही हिंदूंचा द्वेष करा. हिंदूंच्या धार्मिक प्रतीकांचा अपमान करा. हिंदूंना वारंवार हीन लेखा हे सांगितलेले नाही आहे. हा मुद्दा व्यवस्थित मेंदू मध्ये घुसवून घ्या.

हिंदूंची ही धार्मिक प्रतीके असतील, हे हिंदूंना उपास्य असतील. पण मी आता बौद्ध झालो आहे आणि आता माझ्यासाठी या सर्व गोष्टी शून्य झाल्या आहेत. माझ्या साठी यांचे मूल्य शून्य आहे हा संदेश २२ प्रतिज्ञा देतात. या प्रतिज्ञा कुठेही द्वेष शिकवत नाहीत. पण या साध्या सोप्या सरळ तत्वाचे पालन आंबेडकरवादी बौद्ध करतात का ? करत नाहीत. करत असते तर हे आवाहन करण्याची वेळ आली नसती.

आता थोडे वास्तव समजून घ्या. गेल्या दोन ते अडीच हजार वर्षांच्या पासून गौतम बुद्धाचा संदेश जगभर नेणारे भारतीय बौद्ध भिक्कू स्वतःच्या बरोबर बुद्ध धम्माचे शुद्ध स्वरूप घेऊन गेले. ज्या मध्ये गणपती, सरस्वती, तारा , वज्र वाराही या हिंदू देवी देवता सुद्धा अंतर्भूत होत्या. कारण स्वतः गौतम बुद्ध मी सनातन धर्माच्या पेक्षा काही वेगळे सांगतो आहे हा दावाच करत नाहीत. स्वतः गौतम बुद्ध ब्राह्मण कसे वंदनीय आहेत याचे विवेचन करतात. स्वतः गौतम बुद्ध यज्ञ हिंसेचा विरोध करतात. स्वयंप्रकाशी व्हा हे सांगतात. त्यांचे स्वरूप सनातन धर्माच्या सुधारकाचे आहे.

बुद्ध विचाराला आणि धम्माला नंतर वेगळ्या धर्माचे स्वरूप देणे हा राजकीय भाग आहे आणि तो स्थानिक भिक्कुंनी पार पाडला आहे. जगात बुद्ध धम्माची ओळख सत्य सनातन धर्माची शाखा आणि एक परिपक्व विचार म्हणूनच आहे. ही ओळख आजची नाही २००० वर्ष जुनी आहे. या ओळखीला आजचे आंबेडकरवादी बौद्ध लोक बदलू शकत नाहीत आणि हे समजण्याची परिपक्वता आंबेडकरवादी बौद्धांनी विकसित करणे आवश्यक आहे. हा विवेक तुम्हाला विकसित करता आला तर हिंदू आणि बौद्ध यांच्यात शांततापूर्ण सहजीवन सहज शक्य आहे कारण आपल्यात बाकी काहीही भेद नाही.  आणि या विवेकाला फाट्यावर मारत जो हिंदू द्वेष पोसला जातो आहे आणि जय भिम जय मिम च्या घोषणा दिल्या जात आहेत त्या मागील ऐतिहासिक सत्य आधी समजून घ्या.

बौद्ध भिक्कुंनी आपल्या धर्माचा राजकीय विस्तार व्हावा म्हणून खैबरखिंडीच्या पलीकडील आक्रमकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि या देशाची वाट दाखवली. अट एकच तुम्ही जी भूमी पादाक्रांत कराल तिथे बुद्ध धम्म हाच अधिकृत धर्म घोषित करायचे.  मुस्लीम आक्रमकांनी अल तकिया चा सहारा घेतला. बौद्ध धम्म स्वीकारला. भारतात प्रवेश केला आणि मग या बौद्ध भिक्कुंची कत्तल करत इस्लामचा प्रसार केला. याची सुरुवात अफगानिस्तान पासून झाली आहे. मी जे सांगतो आहे ते ऐतिहासिक सत्य आहे. इतिहासाची पुस्तके धुंडाळून पहा कोट्यावधी पुरावे मिळतील.

आज तुम्ही त्याच मुसलमानांच्या वळचणीला जाऊन उभे रहात आहात ज्यांनी बौद्ध भिक्कुंची कत्तल केली आहे. का ? केवळ हिंदू द्वेष म्हणून ? पण हा द्वेष तर २२ प्रतीज्ञांच्या मध्ये कुठे सुद्धा नाही. मग तुम्ही हिंदू द्वेष का करत आहात ???

बामियान इथे असलेली बुद्ध मूर्ती केवळ दगडात कोरलेली नाही. तिथे अश्या भरपूर मूर्ती होत्या. आणि या मुर्त्या साध्या नव्हत्या. प्रत्येक मूर्ती ही सोन्याने मढवलेली, रत्नजडित अशी होती.. काही किलोमीटर वरून झळाळणारी होती. अर्थात बौद्ध धम्माला या देशात राजाश्रय होता. आणि या धम्माची राज्ये सुद्धा प्रचंड सुखी , समाधानी आणि समृद्ध होती. काही निर्बुद्ध भिक्कुंनी इस्लामी आक्रमकांना बोलावले आणि परिणाम काय झाला ? अफगानिस्तान पासून थेट बिहार पर्यंत सर्वत्र बौद्ध धम्म नष्ट होऊन इस्लामी राजवट दृढ झाली. जिथे जिथे बौद्ध धम्म होता तिथे तिथे इस्लामी राजवट आली. अर्थात बौद्ध भिक्कुंनी आपल्याच हाताने आपल्याच धर्माचा गळा मुस्लिमांच्या कडून घोटून घेतला आहे.

तक्षशीला आणि नालंदा येथील विश्वविद्यालये मुस्लिमांनी जाळली आहेत. तेथील ज्ञान नष्ट केले आहे. यात हिंदूंचा शून्य सहभाग आहे. हे सगळे पाप केवळ हिंदू धर्माच्या द्वेषाच्या पोटी तत्कालीन बौद्ध भिक्कुंनी केले आहे. आज सुद्धा जय भीम जय मिम या घोषणा देणारे तेच पाप करत आहेत. काल एका कोवळ्या दलित मुलीवर अत्याचार करणारा मुस्लिमच निघाला. पण आता बौद्ध संघटना गप्प आहेत. त्यांचा हा बोटचेपेपणा बौद्ध धाम्मियांचा काळ होऊ शकतो हे समजून घेण्याची आवश्यकता आहे.

जय भीम जय मिम मधील षड्यंत्र समजून घ्या. हिंदू धर्मीय लोकांशी मैत्री स्थापन करा. ते तुम्हाला कधीही हिंदू व्हा सांगणार नाहीत. बौद्ध आहात. बौद्धच रहा. पण हिंदू द्वेषाला मूठमाती द्या. असे वागणे म्हणजे प्रबुद्ध होणे आहे. तुमचा एकही राजकीय नेता तुम्हाला हे सांगणार नाही कारण त्याला जय भीम जय मिम घोषणा देण्याचे कोट्यावधी रुपये मिळत असतात. तुम्ही हिंदू द्वेष करता. पण तुम्हाला हे माहिती आहे का ? हिंदू लोक बुद्धाला विष्णूचा नववा अवतार मानतात. आदि शंकराचार्यांनी रचलेल्या दशावतार स्तोत्राच्या मध्ये नवव्या अवताराचा श्लोक गौतम बुद्धांवर आहे आणि तो श्लोक गौतम बुद्धांचे अत्यंत चपखल वर्णन करतो.

धराबद्धपद्मासनस्थाङ्घ्रियष्टिर्नियम्यानिलं न्यस्तनासाग्रदृष्टिः ।

य आस्ते कलौ योगिनां चक्रवर्ती स बुद्धः प्रबुद्धोऽस्तु निश्चिन्तवर्ती ॥ ९॥

इतकेच नाही तर आज सुद्धा प्रत्येक हिंदू पूजा करताना जो संकल्प मंत्र म्हणतो त्यात बुद्धावातारे हाच उल्लेख असतो. कारण बुद्ध हा हिंदूंच्या साठी सुद्धा अवतार आहे. पण फक्त अवतार आहे. मूळ ईश्वरी तत्व नाही. त्यामुळे तो वंदनीय आहे. अनुकरणीय आहे पण तो एकमेव मार्ग नाही. तो अनेक मार्गांच्या पैकी एक मार्ग आहे ज्याचा वापर करून अंतिम सत्याला जाणून घेता येते.

बौद्ध लोकांच्या दृष्टीने तो एकमेव मार्ग आहे. अर्थात आमच्या दृष्टीने बौद्ध हा धम्म , संप्रदाय आहे. या पेक्षा अधिक नाही. सध्याचे बौद्ध धम्माचे सर्वोच्च गुरु दलाई लामा यांच्या साठी सुद्धा सगळ्या हिंदू देवी देवता वंदनीय आहेत. ते बौद्ध धम्माला हिंदू धर्माचीच शाखा मानतात. आणि त्यांना यामध्ये काहीही गैर किंवा अपमानास्पद वाटत नाही. त्यामुळे तुम्ही आंबेडकरवादी म्हणून हिंदू धर्माशी नाळ तोडली असेल तरीही द्वेष करण्याचे काहीही कारण नाही. तुम्ही हिंदू धर्म त्यागून हा धम्म स्वीकारला आहे याचे पालन करा. आणि हा धम्म हिंदू धर्माचा द्वेष करत नाही हे आत्मसात करा. डॉक्टर आंबेडकर यांना सुद्धा असा द्वेष करणे अभिप्रेत नव्हते हे समजून घ्या.. जय भीम जय मिम च्या घोषणा करणारे स्वार्थी आहेत आणि हे मी सांगण्याची गरज नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे इस्लाम विषयक विचार वाचा. म्हणजे माझा मुद्दा आपोआप समजेल. वाचाल तर वाचाल. नाहीतर बौद्ध भिक्कुंच्या चुकीने बुद्ध धम्म आपल्या देशातून यापूर्वी संपला आहे. परत तुमच्या चुकीने तेच होणार आहे.

हिंदू तर त्या परिस्थितीत सुद्धा तग धरून राहिले आणि पुन्हा उभे राहिले. पण डॉक्टर आंबेडकर यांनी बौद्ध धम्माला पुनरुज्जीवित केले नसते तर बौद्ध धम्माची काय अवस्था होती हे बघून घ्या. म्हणजे माझा मुद्दा समजेल. तुम्ही आजही बौद्ध धम्म हा राष्ट्रीय धर्म असणाऱ्या आशियातील देशांच्या मध्ये जा आणि बघा. तिथे संस्कृती हिंदू आहे धम्म बौद्ध आहे. बुद्धाच्या इतकेच श्रीराम आणि श्रीकृष्ण पण त्यांना वंदनीय आहेत. बुद्धाच्या जोडीला ते सरस्वती आणि गणेशाचे सुद्धा पूजन करतात. इंडोनेशिया आधी बौद्ध देश होता. आता पूर्ण मुस्लीम राष्ट्र आहे तरीही त्यांच्या संस्कृतीचा गाभा रामायण आहे त्यांच्या नोटेवर गणपतीचे चित्र आहे. हिंदू संस्कृतीशी असलेली नाळ त्यांनी तोडली नाही.  जपान मध्ये जा तिथे सुद्धा गणपती, सरस्वती आणि बुद्ध आहे. त्यांनी सुद्धा हिंदू संस्कृतीशी असलेली नाळ तोडली नाही.  तुम्ही नाळ तोडली तरी हरकत नाही. पण तुम्ही मुस्लिमांच्या वळचणीला जाऊन बसाल तर परत एकदा तुमचा सर्वनाश होईल.

पटले तर घ्या.. नाहीतर सोडून द्या.. माझे मुद्दे योग्य आहेत हे तुम्हाला येणारा काळ निश्चित समजावून सांगेल.

साभार -लेखक :सुजीत भोगले

Disclaimer : या लेखात व्यक्त झालेली मते हि लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या वेब साईटचे व्यवस्थापन त्याचे समर्थन करीत नाही.

====  +  ====

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *