भारताच्या फाळणीमुळे भारताचे भले झाले

1 min read

Opinion

भारताच्या फाळणीमुळे भारताचे भले झाले लेखक श्री योगिन गुर्जर

आज देशाची फाळणी होऊन जगाच्या नकाशावर पाकिस्तान नावाचा देश तयार झाला.
फाळणीला मान्यता देणारे आपले नेते किती दुरदृष्टीचे होते हे आजच्या देशातंर्गत परिस्थिती वरुन लक्षात येते.
महात्मा गांधी यांनी नाईलाजाने का होईना फाळणीला मान्यता दिली हा त्यांच्या मनाचा मोठेपणा. अन्यथा त्यांनी जर एखाद्या गोष्टीचा हट्ट धरला तर ती पुर्ण करायचेच. त्यांनी घोषणा केली होती की फाळणी माझ्या देहावरच होईल. जर खरोखरच महात्मा गांधी यांनी आपला जीव पणाला लावला असता तर देशात अभुतपुर्व परिस्थिती निर्माण झाली असती.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा फाळणीला मान्यता दिली. ( तेव्हा ते घटना समितीचे अध्यक्ष नव्हते )
त्यांनी फाळणीला का मान्यता दिली ,याचे विस्तृत विवेचन आपल्या एका पुस्तकात केले आहे. त्या पुस्तकातील एक उतारा इथे देत आहे.

अखंड भारत का झाला नाही ? –
डॉ बाबासाहेब आंबेडकर.

डॉ. आंबेडकर फाळणीचे पुरस्कर्ते होते. हिंदु आणि मुस्लिम यांचे सहजीवन अवघड आहे . भारत अखंड राहिला तर धार्मिक संघर्ष इतके जास्त होतील कि हिंदुंचा सामजिक सुधार अशक्य होऊन बसेल त्यामुळे फाळणी करावी असे त्यांचे मत होते .

पाकिस्तान बाबतीतले इस्लामी धर्म शास्त्र उलगडून सांगताना ते म्हणतात :
“मुस्लिमांच्या दृष्टीने हिंदु काफिर आहेत .काफ़िरांचि लायकी मान सन्मानाची नाही . इस्लाम नुसार काफिर जन्मानेच नीच (low born ) आणि दर्जाहीन (without status) असतात. काफिर शासित देशाला दार उल हरब असे म्हणतात. हे सर्व पाहता मुसलमान लोक हिंदु सरकारचे आदेश पाळणार नाहीत हे सिद्ध करायला आणखी पुराव्यांची गरज नाही . “( ८ – ३०१)

पाकिस्तानवरील पुस्तकाचे एक प्रकरण राष्ट्रीय फ़्रस्ट्रेशन नावाचे आहे . त्यातील ३२८ -३३० या पानांवर बाबासाहेबांनी हिंदु मुस्लिम प्रश्नाची चिकित्सा केलेली आहे .

बाबासाहेब लिहितात ” ब्रिटिशांच्या फोडा आणि झोडा या नीतीमुळे हिंदु मुस्लिम संबंध बिघडले हे खरे नाही . ब्रिटिशांच्या पूर्वीपासून भांडणे होतीच. (८-३२८) हिंदु आणि मुस्लिमातील राजकीय भांडण हा ऐतिहासिक, धार्मिक , सांस्कृतिक आणि सामजिक घटक परस्पर विरोधी ( Antipathy) असल्याचा परिणाम आहे. (8-229) . अकबर आणि कबीर या सुधारकांच्या कार्याचा इष्ट परिणाम झालेला नाही . ” (८-३३०)

याचे अधिक विश्लेषण करताना आंबेडकर लिहितात : –
” इस्लामी बंधुत्व हे सर्व मानवांसाठी नाही. ते फक्त मुस्लिमांपुरतेच मर्यादित आहे. मुस्लिम बंधुसंघा ( Corporation) साठी सर्व प्रेम व फायदे आहेत . जे मुस्लिम बंधुसंघाबाहेर आहेत त्यांकरता घृणा आणि शत्रुत्व याशिवाय काहीही नाही ….. भारताला आपली मातृभूमी आणि हिंदुना बांधव मानण्याची परवानगी – इस्लाम धर्म सच्च्या मुस्लिमाला देत नाही . ” (८-३३०)

अशा धार्मिक कारणांमुळे हिंदु मुस्लिम ऐक्य अशक्य आहे म्हणुन बाबासाहेबांनी फाळणीला पाठींबा दिला होता.

फ़ाळणिपुर्वि १ ९ ४ ० साली आंबेडकर म्हणाले होते – ” जर फाळणी झाली नाही तर भारत हे एक, परिणामशुन्य राज्य बनेल- जणु जिवंत प्रेत, न पुरलेला मृतदेह ” (८-३४०)

फाळणी झाल्यानंतर १ ९ ५ ५ साली – बाबासाहेब म्हणाले होते. — ” पाकिस्तान पासून भारत वेगळा झाला याचा मला आनंद झाला होता . तसे पाहता मीच पाकिस्तानचा तत्वज्ञ होतो. मी फाळणीचे समर्थन केले ते यासाठी कि , केवळ फाळणीमुळे हिंदु स्वतंत्रच नव्हे तर मुक्त होऊ शकणार होते . जर भारत अखंड राहिला असता तर हिंदुना मुस्लिमांच्या दयेवर जगावे लागणार होते. जर फाळणी झाली नसती तर अखंड भारतात एका देशाचे पण दोन राष्ट्रांचे सरकार अस्तित्वात आले असते आणि या दोन राष्ट्रांपैकी मुसलमान हि निश्चितपणे शासनकर्ति जमात बनली असती . ” (१-१४६)

त्यावेळच्या अखंड भारतातले मुस्लिम लोकसंख्येचे ३५% हे प्रमाण लक्षात घेतले तर आंबेडकरांच्या लेखनाची खोली लक्षात येते आणि तत्कालीन कोन्ग्रेस किंवा हिंदुसभेला हि गोष्ट कशी कळली नाही ? याचेही आश्चर्य वाटते .

त्यापुढे जाउन बाबासाहेब असेही म्हणतात कि – ” जेंव्हा फाळणी झाली तेंव्हा मला वाटले कि परमेश्वराने या देशावरील शाप काढुन घेतला असून हा देश एकसंघ , महान व वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ” (१-१४६)

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे हे बुद्धिवादी विचार आपण समजून घेणार आहोत काय ?

लेखक श्री योगिन गुर्जर. ( From his FB wall )
पुणेरी सोलापुरकर.

Disclaimer : सदर लेखातील मते हि लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या वेब साईटचे व्यवस्थापन या मतांचे समर्थन करत नाही.

====  +  ====

Top of Form

Bottom of Form

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *