श्रीराम मंदिर निर्माण सुरु झाले आहे. आता पुढे काय ?

1 min read

Opinion

श्रीराम मंदिर निर्माण सुरु झाले आहे. आता पुढे काय ?

तेजो महाआलंय ? लेखक : श्री सुजित भोगले

 

श्रीराम मंदिर हे आक्रमकांनी उध्वस्त केलेले  एकमेव मंदिर, एकमेव वास्तू नाही. या देशात हजारो मालमत्ता अश्याच बळकावल्या गेल्या आहेत, तितक्याच उध्वस्त केल्या आहेत आणि तितक्याच विद्रूप करून त्यांना इस्लामी वास्तूशास्त्र म्हणून जगाच्या गळ्यात मारले गेले आहे.

 

इंडो इस्लामिक वास्तुशास्त्र म्हटले जाते हा एक विकृत प्रकार आहे. संपूर्ण वास्तू हिंदूंची, हिंदूंच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने आणि तंत्रज्ञानाने बनवलेली आहे.  पण wall paper लावावा तसे वरून इस्लाम चे आवरण दिले आणि बेशरमपणे संपूर्ण वस्तू आम्हीच निर्माण केली असे तद्दन खोटे सांगितले गेले आणि त्याला इंडो इस्लामिक आर्कीटेक्चर असे गोंडस नाव दिले गेले.

 

sarscenic architecture नावाची एक संपूर्ण भ्रमित शाखा ब्रिटिशांनी निर्माण केली आहे. ज्यात ब्रिटीश, तथाकथित इस्लामिक आणि भारतीय स्थापत्यशैलीचे फ्युजन साधले गेले आहे. ब्रिटिशांनी देशात निर्माण केलेल्या सगळ्या वास्तूंमध्ये हा विकृत प्रकार त्यांनी घडवला आहे. याला आपले संसद भवन सुद्धा अपवाद नाही.

 

स्वतःच्या स्थापत्य कौशल्याच्या मुघलांनी खोट्या कथा रचल्या आणि प्रसृत केल्या. ब्रिटिशांनी सत्ता मिळवली की त्यांनी हे असत्य आधी व्यवस्थित समजून घेतले आणि मग त्याचा शतपट अधिक प्रचार केला. कारण या प्रचारातून हिंदूंना न्यूनगंड निर्माण करणे आणि त्यांना मानसिक गुलाम ठेवणे शक्य होणार होते. ब्रिटिशांना मुस्लिमांची चिंता कधीच नव्हती. कारण ते कट्टर असले तरी ते कधीही उत्कृष्ट योद्धे नाहीत हे त्यांना माहिती होते. त्यांच्या क्रौर्याला आणि लढाऊ वृत्तीला आधुनिक शस्त्रे वापरून आपण चार दिवसात थंड करू शकतो ही खात्री ब्रिटिशांना होती. पण हिंदूंच्या बुद्धिमत्तेची, तांत्रिक प्रगतीची ब्रिटिशांना साधार भीती होती म्हणूनच त्यांनी हिंदूंना चेपण्याच्या या संधीचा पुरेपूर लाभ घेतला.

 

आपली अत्यंत सुंदर मंदिरे, वास्तू यांना ब्रिटीश रेकोर्ड मध्ये आणि इतिहास लेखनात आवर्जून इस्लामिक वास्तू असेच संबोधले. आज या वास्तूंच्या संदर्भात खटला दाखल झाला तर ब्रिटीश रेकॉर्ड हा पहिला पुरावा असतो आणि त्यात उल्लेख इस्लामिक वास्तू असा होतो. त्यापेक्षा जुना पुरावा आणायचा असेल तर ते संशोधनाचे टास्क होते.

 

आणि  दुर्दैवाने स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा मागील पानावरून पुढे चालूया या धर्तीचेच कामकाज होते त्यामुळे हे गैरसमज अधिकाधिक दृढ होत गेले आहेत.  राजाश्रय ज्या मानसिकतेला असतो त्या मानसिकतेचे विद्वान राजदरबारी वावरतात हाच प्राचीन नियम आहे त्यामुळे सर्व स्वरूपाच्या संशोधन प्रांतात आधी ब्रिटिशांना बाप मानणारी आणि आता फुरोगामी किंवा कम्युनीच मानसिकतेची मंडळी या सत्यावर कुंडली मारून बसली आहेत. त्यांच्या तावडीतून खरा इतिहास शोधणे आणि सिद्ध करणे अधिकच जिकीरीचे कार्य आहे.

 

तेजो महा आलय उर्फ ताजमहाल च्या संदर्भात नेमके हेच घडले आहे.

 

श्री पुरुषोत्तम नागेश ओक उर्फ पु ना ओक हा आझाद हिंद फौजेत नेताजींच्यासह लढलेला योद्धा. कट्टर हिंदू आणि अस्सल मराठी माणूस. यांनी जवळ जवळ २० वर्ष संशोधन करून १९६८ साली पहिल्यांदा ताजमहाल चे सत्य लोकांच्या समोर मांडले. त्यानंतर उर्वरित संपूर्ण आयुष्य या संशोधनाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या साठी खर्च केले.  या तपस्व्याने हयातभर प्रचंड टीका, विरोध, टिंगलटवाळी, द्वेष सहन केला परंतु अत्यंत तार्किकपणे त्यांनी सत्य मांडले होते त्याला थेट खोडून काढणे आजवर कुणालाही शक्य झाले नाही.

 

उद्गार भारत तर्फे पु ना ओक यांच्या या तपस्येला आम्ही विनम्र अभिवादन करतो.

 

पु ना ओक यांचे कार्य आजच्या तरुण पिढीपर्यंत पोचवणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय हिंदू धर्म पुनरुत्थान प्रक्रिया अंतिम गन्तव्याकडे पोचणे शक्य नाही.  यासाठी आपल्या देशातील स्थापत्यकला किती उत्कृष्ट आणि अतुलनीय होती व आपल्यावर हल्ला करणाऱ्या शत्रूने त्या वास्तूंना भ्रष्ट करून ते आपल्या नावावर कसे खपवले आहे. आपल्याला आणि जगाला कसे भ्रमित केले आहे हे सत्य पुराव्यांसह मांडणे अत्यंत आवश्यक आहे.

 

हेच कार्य श्री पु ना ओक यांनी हयातभर केले. आजच्या तरुण पिढीला हा वारसा आजच्या प्रेझेन्टेशन युगाला साजेश्या स्वरुपात देण्याच्या हेतूने आम्ही सर्वप्रथम ओकांनी लिहिलेल्या ताज महाल संबंधित सर्व इंग्रजी भाषेतील पुस्तकांचे संकलन केले. त्यातील मुद्देसूद भाग घेतला. त्या भागाच्या पुष्ट्यर्थ असणारी छायाचित्रे मिळवली आणि हे संकलन स्वरूपातील पुस्तक तयार केले आहे. छायाचित्राचा संदर्भ देऊन एखादा मुद्दा सांगितला तर तो अधिक लवकर आत्मसात होतो म्हणून त्याच पद्धतीचा आम्ही वापर केला आहे. आमच्या या संपादित आवृत्ती मध्ये बरीचशी छायाचित्रे आपण इतरत्र किंवा पु ना ओक यांच्या पुस्तकात सुद्धा यापूर्वी पाहिली नसतील. ते मिळवण्याच्या साठी आम्ही भरपूर प्रयास केले आहेत.

 

उदाहरणच द्यायचे असेल तर बटेश्वर इन्स्क्रीप्शन अर्थात बटेश्वर शिलालेख. हा शिलालेख तेजो महा आलय मध्ये जमिनीत गाडलेला होता. ज्याला शहाजहान ने उखडून फेकून दिले. त्याचे महत्व न उमजल्याने तो नष्ट केला गेला नाही. आज हा शिलालेख लखनौ वस्तूसंग्रहालयात उपलब्ध आहे. हा शिलालेख आणि त्याचे विवेचन आमच्या पुस्तकात आम्ही विस्तृत स्वरुपात दिले आहे.

 

पूर्वग्रह न ठेवता जर हे पुस्तक वाचले तर ताज महाल हा निःसंशय तेजोमहाल आहे याबद्दल वाचकाची खात्री पटेल असे सादरीकरण आम्ही केले आहे. इथे परत एकदा नमूद करतो आहे की सगळी तपस्या, कष्ट श्री पु ना ओक यांचेच आहेत आम्ही फक्त आजच्या काळाच्या अनुरूप सादरीकरण करतो आहे.

 

पुस्तक मुद्दामून इंग्रजी भाषेत छापले आहे जेणेकरून त्याला जागतिक व्यासपीठावर आम्हाला वितरण करणे शक्य होईल. पुस्तकाचा दर्जा आंतरराष्ट्रीय मानकांच्या अनुसार आहे. त्यामुळे किंमत थोडीशी जास्त वाटू शकेल. परंतु पुस्तक हातात आल्यावर त्याचा छपाईचा दर्जा. फोटोचा दर्जा आणि मांडणी पाहिल्यावर पुस्तकाच्या साठी खर्च केलेला प्रत्येक रुपया सत्कारणी लागला आहे याची वाचकाला खात्री पटेल असा आम्हाला विश्वास आहे.

 

केवळ पुस्तक छापून आणि चर्चेत आणून खळबळ माजवणे हा उद्गार भारत चा हेतू नसून या विषयाचे शास्त्रीय पद्धतीने पुनःसंशोधन आवश्यक आहे हे आमचे मत आहे आणि त्यासाठी लागणारी तज्ञांची टीम सुद्धा आमच्या कडे उपलब्ध आहे. या संशोधनाच्या साठी आम्ही योगी आदित्यनाथ यांच्याकडे परवानगी सुद्धा मागितली आहे. आम्हाला विश्वास आहे आम्हाला नक्कीच आणि लवकरच परवानगी प्राप्त होईल.

पुस्तक आपल्याला ऑनलाईन घरपोच मागवायचे असेल तर खालील लिंक चा वापर करा..

https://rzp.io/l/tejomahalay

लेखक: श्री सुजित भोगले

Disclaimer : सदर लेखात व्यक्त केलेली मते हि त्या लेखकाची व्यक्तिगत मते आहेत. या वेब साईटचे व्यवस्थापन या मतांचे समर्थन करीत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *