हिंदू धर्माचे प्रतिनिधी कोण? लेखक नंदलाल गवळी

1 min read

Opinion

हिंदू धर्माचे प्रतिनिधी कोण?  लेखक नंदलाल गवळी

हिंदू धर्म म्हणजे काय ते इथे अगोदर समजले पाहिजे. आज हिंदू धर्म म्हणजे जो मुस्लीम नाही, ख्रिचन नाही तो म्हणजे हिंदू अशी हिंदू धर्माची व्याख्या केली जाते. ती आज जरी बरोबर वाटत असली तरी ज्याकाळी हिंदू हे नाव उगम पावल त्याकाळी अशी व्याख्या अभिप्रेत नव्हती. मुळात, त्याकाळी म्हणजे इ.स.पू ५०० मध्ये आजचा भारत जसा आहे तसा नव्हता. त्याकाळी, इराण, इराक आणि मध्यपूर्व आशिया देखील भारताचाच भाग होता. या क्षेत्रात कालिकतच्या राज्याचे राज्य होते. तिथे केरळ मधून मसाल्याचा व्यापार चालत होता. आता इतक्या मोठ्या प्रांतात लोकांचे प्रांताप्रमाणे नामकरण आलेच.

जसे काही वर्षापूर्वीपर्यंत सगळे दक्षिण भारतीय लोक आपल्यासाठी मद्रासी होते तसेच, त्याकाळच्या भारताचे सिंधू नदीमुळे दोन तुकडे झालेले होते. सिंधु नदीपलीकडच्या लोकांना सिंधू वरून हिंदू म्हणून ओळखले जाऊ लागले. हि ओळख संपूर्णपणे भौगोलिक होती. यात धर्माचा संबंध नव्हता. कारण, त्याकाळी, मध्यपूर्वेतील लोक देखील वैदिक आचरण करायचे. म्हणजे, एका वैदिकांच्या गटाने दुसऱ्या वैदिक गटाला हिंदू नाव दिले इतकच!

अर्थात, यानंतर मुघल, मुस्लीम घुसखोर सिंधू नदीपलीकडे म्हणजे आजच्या भारतात आले. त्यांनी येतांना मात्र हिंदू नाव देखील सोबत आणले. दरम्यानच्या काळात भारतात मुस्लीमआणि ख्रिचन मताचे लोक वाढले. आणि, हि धर्मवाले लोक राज्यकर्ते असल्याने हिंदू म्हणजे तुच्छ, गुलाम अशी भावना सगळीकडे पसरली. नवबौद्ध, सिख, जैन वगैरे धर्म फार नंतर म्हणजे ब्रिटीशकाळात बनवले गेले.

हिंदू धर्म आणि इतर अब्राह्मिक धर्माची नेहमी तुलना केली जाते. अब्राह्मिक धर्मात प्रत्येक गोष्ट डीफायीन असते. त्यांचे देव, दिनचर्या, लोकाचे कृत्य वगैरे सांगितलेले असतात. जर, तुम्ही ते मानले नाही तर तुम्ही नॉन-बिलीव्हर किंवा काफिर असतात. म्हणजे, त्यांची व्यवस्था तुम्ही मानायचीच असा हट्टच असतो. हिंदू धर्मात मात्र तसे काही नसते. तुम्ही हिंदू धर्म न मानता देखील हिंदू राहू शकता. इथे तुम्हाला देव मानायची देखील सक्ती नसते. तुम्ही देवावर किंवा देवाविषयी लिखाणावर प्रश्न विचारू शकतात. उत्तरे शोधू शकता, उत्तरे मिळवू शकता, तर्क करू शकता. अब्राह्मिक धर्मात मात्र प्रश्न विचारणे, तर्क करने यावर संपूर्ण बंदी असते. समजा एखाद्या मुस्लीम व्यक्तीने विचारले की गाब्रीयालने प्रेषित मुहम्मदना कुराण म्हणजे अल्लाहचे आदेश सांगितले याचा पुरावा काय? तर इस्लामी मताचे जेष्ठ लोक लगेच त्या व्यक्तीला काफिर ठरवून मोकळे होतील. तसेच, एखाद्या ख्रिचन व्यक्तीने विचारले की येशू मेल्यावर देखील जिवंत कसा होऊ शकले? तर पोप वगैरे मंडळी त्या व्यक्तीला नॉन-बिलीव्हर म्हणून ख्रिचन मतातून बेदखल करतील.

सगळेच अब्राह्मिक धर्म म्हणजे लोकांना आम्ही म्हणू तेच तुम्ही खर मानायचे अशा धर्तीवर बनलेले आहे. या मतात मानवाला मानसिक गुलाम बनवले जाते. त्यात हिंदू धर्म मात्र अत्यंत वेगळा दिसून येतो. यात कुठल्याही प्रकारची गुलामी नसते. तुम्ही शिवशंकर माना की वासुदेव कृष्ण माना. यात काही भेद नसतो. अर्थात, ब्रिटीशकाळात शैव-वैष्णव भेद बनवला, त्यात भांडणे देखील लावली गेली आणि ते पूर्ण राजकारण होत हि गोष्ट आज लोकांना कळलेली आहे.

अब्राह्मिक धर्माचे लेटेस्ट उदाहरण द्यायचे झाले तर कॉव्हीडचे देवू शकतो. यातही तुम्ही एकतर सिम्तोमेटिक असाल किंवा असिम्तोमेटिक असाल. अधल-मधल काहीही नाही.

आता धर्मग्रंथ बद्दल बोलूया. अब्राह्मिक धर्माचे ग्रंथ लिहिलेले आहे. त्यात प्रत्यकाने कसे वागले पाहिजे याचे डिक्टेशन केलेले आहे. तुम्ही त्यांनी सांगितले तसेच वागले पाहिजे हि जबरदस्ती आहे. हिंदूंना मात्र तसला कुठलाही धर्मग्रंथ नाही. त्यातल्या त्यात भगवतगीता धर्मग्रंथ म्हणावा तशा व्याख्येच्या जवळ जातो. पण, त्यात धर्म म्हणजे हिंदू धर्म असा अर्थ भगवन कृष्णाला अपेक्षित नाही. तिथे उल्लेख केलेला धर्म म्हणजे मानवधर्म. जो सगळ्या मानवजातीला लागू आहे. रामायण, महाभारत, पुराणे किंवा वेददेखील धर्मग्रंथ नाही. रामायण म्हणजे एक आदर्श व्यक्ती कसा असला पाहिजे याचा इतिहास आहे आणि महाभारत म्हणजे नात्यानात्यातील गुंता आणि शुद्ध राजकारण कसे असते त्याचे उदाहरण आहे. पुराणे खगोलशास्त्र, भूमंडळीय, ऐतिहासिक घटनांच्या रूपककथा आहेत. त्यात सांगितलेला धर्म म्हणजे हिंदू धर्म असा देखील अभिप्रेत नाही. लौकिकअर्थाने बघायला गेल तर हिंदू धर्माला कुठलाही धर्मग्रंथ नाही. आणि, त्यातच हिंदू धर्मचे सौंदर्य आणि वेगळेपण सामावलेले आहे.

हिंदू धर्म म्हणजे द्वैत-अद्वैतावर श्रद्धा ठेवून आपले कर्म करीत मोक्षाच्या दिशेने वाटचाल करीत राहणे. या एका वाक्यावर उभा असलेला धर्म आहे.

त्यामुळे, हिंदू धर्माला अब्राह्मिक धर्मा सोबत तुलना करणे संपूर्णपणे चुकीचे आहे. स्वा. सावरकरांनी मूळ हिंदू धर्माला अब्राह्मिक धर्माच्या साच्यात फिट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सावरकरांचे हिंदुत्व नास्तिकत्वकडे झुकलेले आढळते. अर्थात, अब्राह्मिक नास्तिक जागतिक सत्ताधाऱ्यांना त्याप्रकारचे हिंदुत्व आवडत असल्यामुळे सावरकरांचे हिंदुत्व म्हणजे खरे हिंदुत्व असा प्रचार त्याच्या मीडियातून (लिखित, दृश्य) केला गेलेला आहे.

ब्रिटीशकाळात हिंदू धर्माच्या श्रद्धा या शब्दाला तिलांजली देवून भक्ती हा शब्द घुसवण्यात आला. भक्ती आणि श्रद्धा यात मूळ फरक आहे की भक्ती व्यक्तीच्या पंचेद्रियाना बंद करून विश्वास ठेवायला शिकवते तर श्रद्धा डोळस असते. त्यामुळे, श्रद्धावान देवाला देखील प्रश्न विचारू शकतो. ते आपण भगवतगीतेत वाचतोच.

संख्यने जास्त असलेल्या हिंदुवर ब्रिटीश २०० राज्य करू शकले. त्यासाठी त्यांनी फुट पाडणाऱ्या काही गोष्टी केल्या त्यात भक्ती आणि गुरु परंपरा एक आहे. त्यांनी देशभरात विविध ठिकाणी फेक गुरु बनवले, संप्रदाय बनवला. आणि गुरु जे म्हणेल तेच सत्य असं नरेतीव्ह रुजवल, गुरूला परब्रम्ह बनवल. एक फेक गुरु त्याच्यासाठी हजारो भक्तांना नियंत्रित करू शकत होता. हजारो वर्ष चालत असलेली गुरु-शिष्य परंपरा त्यांनी अशी दुषित केली.

आदी शंकराचार्यनी भारतात चार दिशेला चार पीठे स्थापून प्रत्येक पिठाला एक-एक वेद संरक्षण करण्यासाठी दिला होता. त्यामागे वेद-ज्ञान पुढच्या पिढ्यासाठी जतन करने इतकीच त्यांची इच्छा होती. त्यामुळे, त्यांनी निर्माण केलेली शंकराचार्य परंपरा हि धर्म-रक्षक नसून ज्ञान-रक्षक अशी होती. त्यामुळे, कुठलेहि शंकराचार्य राजकारणात पडत नाही. धर्मरक्षणाचे खरे काम क्षत्रियाचे होते. पण, ब्रिटीशकाळात सगळ्या क्षत्रियांनी ब्रिटीशांचे मांडलिकत्व पत्करून त्यांना हिंदू धर्मात छेडछाड करण्याची खुली सूट दिली. शंकराचार्यचे हे लिमिट ब्रिटिशांना ठावूक असल्यामुळे, त्यांनी खोटे शंकराचार्य बनवून लोकांत चुकीचा धर्म रुजवला. ज्याचे फळ आजही आपण भोगतोय.

चातुर्वर्ण्य व्यवस्था नैसर्गिक व्यवस्था आहे. सगळा भारत देश चारच भागात वाटलेला होता. त्यामुळे ब्रिटिशांना त्यावर नियंत्रण करने अवघड होते म्हणून त्यांनी पोर्तुगीज शब्द “Casta” वरून Caste म्हणजे जाती आणल्या. त्यासाठी त्यांनी व्यवसायावरून लोकांचे गट बनवले. आता चार वर्ण १००० जातीत विभागाला गेला. त्यामुळे, त्यांना जातीय फुट पाडून राज्य करने सोपे गेले. त्यामुळे जातीव्यवस्थेला चातुर्वर्ण्य नाव नाही. दोन्हीही पूर्ण वेगवेगळे concepts आहेत.

हिंदू धर्माचे खरे प्रतिनिधी राजे लोक होते ज्यांना धर्म रक्षण, प्रजा रक्षण अशी जबाबदारी होती. त्याचे मनुस्मृतीत बरेच वर्णन आले आहे. त्यामुळेच, मनुस्मृती ब्रिटीश राज्यकर्त्यांच्या हिट-लिस्ट वर होती. लोकांचे, धर्माचे रक्षण करायला सांगणारी मनुस्मृती लोकांना गुलाम बनवणाऱ्या ब्रिटिशांना कशाला आवडेल? आत्ताच्या काळात हिंदू धर्माचे रक्षण करण्याची जबाबदारी राजकारणी लोकांची आहे. पण, तिथेही हि परकीय लोक बोट घालायचे काम करत असतात. असो, त्याबद्दल नंतर कधीतरी लिहूया. जातीय फुट जरी ब्रिटिशानी पाडली असली तरी स्वातंत्र्यानंतर प्रत्येक सरकारने जाती टिकून राहतील असेच प्रयत्न केले. जातीय आरक्षण या एकामुद्द्यामुळे जाती घट्ट होण्यास मदत झाली. आरक्षण घेतांना जात घोषित करावी लागते, तिला validate करावे लागते. त्यामुळे जातीचा शिक्का अजून जास्त गडद होतो.

अतिशय हुशारीने, चतुराईने हि सिस्टम बनवलेली आहे. यामुळे, धर्माला आपोआपच जडत्व येते. भारतीय सरकाने ठरवले तर एका फटक्यात जाती संपुष्टात आणू शकते पण कुठल्याही सरकारची तशी मंशा अजून दिसलेली नाही.

प्रश्नांची उत्तरे :

१. हिंदू धर्माचे प्रतिनिधी फिक्स नसल्याने बाबा-बुवांचे फावते. हे विधान फार उथळ आहे. बाबा-बुवा असे कुणालाही होता येत नाही. त्यासाठी बऱ्याचदा विदेशातून नियंत्रण होत असते. बऱ्याच बाबा-बुवांचे लंडनशी संबध असतात. या बाबा-बुवांना बऱ्याचदा प्लांट केलेले असते आणि त्यांची पेड मिडियातून खूप प्रसिद्धी केली जाते. जेव्हा, या बाबा-बुवांचे उपयोगीकत्व संपते किंवा ते अनियंत्रित होतात तेव्हा त्यांची बदनामी करून त्यांना बाजूला केले जाते. उदा. आसारामबापू. जेव्हा आसारामबापू फेक पात्र राधेचा प्रचार करत होते तेव्हा या विदेशी लोकांना आवडत होते. पण, बापूंनी जेव्हा ख्रिचन मिशनरी लोकांना आव्हान देणे सुरु केले तेव्हा आसारामबापूना खोटे आरोप लावून सरळ जेलमध्ये डांबले. अर्थात, त्याचे सगळे खापर हिंदू धर्मावर फोडले गेले.

२. हिंदू धर्मात अनेक पंथ असल्याने विस्कळीतपणा वाढतो. खरे आहे. पण हि पंथ निर्माण करणारे ब्रिटीशच. लिंगायत पंथ कडप्पाचा जिल्हाधिकारी C P ब्रोउन आणि त्याच्या टीमणे बनवला आहे. लिंगायत पंथ आणि भारतातील बौद्ध धर्म दोन्हीही अब्राह्मिक धर्माच्या साच्यातील पंथ आहेत. त्यांना नियम आहेत, कायदे दिलेले आहे. त्यामुळे या विस्कळीतपणाला ब्रिटीश राजकारण आणि आताचे राजकारणी जबाबदार आहे.

३. शीख वेगळा धर्म आहे असे ब्रिटीश अधिकारी Max Arthur Macauliffe याने प्रचार प्रसार केला होता. बाकी, शीख गुरुबानीत ३००च्या वर हरी शब्द आला आहे. सुवर्णमंदिर हे हरमिंदर साहिब म्हणजे शिवमंदिर आहे. विष्णू आणि शिव यांना मानणारे लोक हिंदूच असणार यात शंका नाही. भारतात जरी बुद्ध धर्म वेगळा आहे तरी तिबेट, जपान ई ठिकाणी बौद्ध देवता मुळच्या हिंदू देवताच आहे. त्यामुळे, बुद्ध हे हिंदुतील एक मत आहे असे लोक मानतात. त्याचे असंख्य पुरावे देखील आहे.

४. हिंदुहृद्यासम्राट असले कुठलेही पद नाही. हा राजकारणी लोकांचा प्रोपोगंडा आहे. काही राजकारण्याचे चेले-चपटे असे उद्योग करत असतात.

५. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्पष्ट केले आहे की ते काही हिंदूंचे प्रतिनिधी नाहीत. पण, त्यांचे कार्यकर्ते सगळ्या मिडिया platform वर हिंदूचे स्वयंघोषित प्रतिनिधी म्हणून वावरतात.

६. स्वतंत्र भारताने तिरंगा झेंडा आत्ताच्या भारत देशाचा झेंडा म्हणून स्वीकारला आहे. त्याला ध्वज म्हणता येणार नाही. कारण ध्वज म्हणजे दोन त्रिकोण एकत्र करून बनवलेला झेंडा. ब्रिटीशकाळाअगोदर सगळ्या राजांचा मोठमोठ्या मंदिरांचा आपापला एक ध्वज होता. त्याचा रंग सहसा भगवा असे. कारण, भगवा रंग संन्याशाचे, विरक्तचेचिन्ह होते. राजाने विरक्त होऊन राजकारभार करावा असा त्याचा अर्थ होता. भगवा-हिरवा-निळा वगैरे रंग राजकारणाचे प्रतिक झाले आहे. आताच्या राजकारण्यांनी ब्रिटीशांचेच सरकार पुढे सुरु ठेवल्यामुळे सगळा गोंधळ उडाला आहे.

७. धार्मिक तेढ हि आजच्या राजकारण्यांची आवडती स्थिती आहे. त्यामुळे, त्याला काही धर्म जबाबदार नाही. ज्यांनी देशाची प्रगती करावी तेच लोकांना धर्मिक तेढेत गुंतवून ठेवतात. त्याला भगवा रंग देखील जबाबदार नाही.

८. गुढी सारख्या परंपरा देखील त्यांनीच घुसवल्या. कारण त्यांना हिंदू धर्म किती मूर्ख धर्म आहे ते दाखवायचे होते. हिंदू धर्मात उलट आणि रिक्त कलश कधीही पुजत नाही. पूजनासाठी कलश नेहमी भरलेलाच म्हणजे पूर्णंम असला पाहिजे. अर्थात, ब्रिगेड सारखे समाजात तेढ लावणारे लोक म्हणतात म्हणून हिंदू स्वतच्याच चुकीच्या गोष्टींचे समर्थन करत जातो. आपले विरोधी जे म्हणतात ते खोटे हाच एक आंधळा विरोध त्याला कारणीभूत असतो. इतर सगळ्या अंधश्रद्ध दाखवणाऱ्या गोष्टी देखील अशाच घुसवलेल्या आहेत.

९. जातीबद्दल वरती थोडक्यात विश्लेषण दिलेले आहे.

१०. जातीबद्दल वरती थोडक्यात विश्लेषण दिलेले आहे.

११. आता प्रश्न विचारणारा विविध घटकांच्या नावाखाली जातींना प्रतिनिधित्व देनायची गोष्ट करतोय. हा निव्वळ दुटप्पीपणा आहे. एकीकडे जाती हटावो म्हणायचे आणि दुसरीकडे जातीय प्रतिनिधित्व मागायचे.

१२. हिंदू धर्मातील घुसवलेल्या वाईट प्रथांना विरोध करायलाच हवा त्यात दुमत नाही. पण, अशीच भूमिका सगळ्या धर्माबद्दल घ्यायला हवी. लीब्रांडू म्हणवणारे लोक असे भंपक असतात. त्यांना हिंदू धर्म सुधारवायचा असतो पण इतर धर्माबद्दल मात्र त्यांचे ढुंगण फाटते.

१३. १४… क्या केहना चाहते हो? प्रश्न विचारणारा धर्म-जाती आणि राजकारणाच्या गुंत्यात गुंतून गेलेला आहे असे दिसते. असो, वर दिलेले प्रश्नाची उत्तरे वाचून हा गुंता थोडा कमी होवो अशी अपेक्षा करतो.

जयतु भारतम् || वंदेमातरम् ||

ले. नंदलाल गवळी

====  +  ====

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *