सर्व देव क्षत्रिय आणि सर्व राक्षस ब्राम्हण होते केवळ बुदधीभेदासाठी राक्षसाना बहुजन म्हटले जाते
1 min read
Opinion
सर्व देव क्षत्रिय आणि सर्व राक्षस ब्राम्हण होते केवळ बुदधीभेदासाठी राक्षसाना बहुजन म्हटले जाते
दक्ष प्रजापती ची कन्या दिती आणि कश्यप ऋषी यांचा पुत्र म्हणजे हिरण्यकश्यपू , त्याची बहिण होलिका , त्याचा मुलगा भक्त प्रल्हाद, भक्त प्रल्हादाचा पुत्र विरोचन आणि विरोचनाचा पुत्र बळी अर्थात महाबली राजा. रंभ या राक्षसाचा पुत्र आणि कश्यप ऋषींचा पणतू म्हणजे महिषासुर. अर्थात ही सगळी मंडळी कश्यप ऋषींच्या वंशावली मधील आहेत. कश्यप ऋषी ब्राह्मण होते. अर्थात हे सगळेच ब्राह्मण. त्यामुळे भक्त प्रल्हादाच्या प्राण रक्षणार्थ ज्या होलिकेला जाळले गेले ती ब्राह्मण होती.
आता यात वामन ब्राह्मण, वामन महाबलीला फसवतो आणि सत्ताभ्रष्ट करतो. परंतु दोघेही ब्राह्मण. महिषासूर ब्राह्मण त्याला मारणारी दुर्गा देवी क्षत्रिय कारण सगळे देव क्षत्रिय आहेत त्यांच्या तेजापासून ती उत्पन्न झाली. जर मारलेले सर्व सगळेच ब्राह्मण होते. तरीसुद्धा ब्राह्मण यांचा द्वेष करतात आणि ईश्वराची स्तुती करतात. मग तो विष्णू असेल, दुर्गा असेल किंवा अन्य कोणी, हे सगळेच क्षत्रिय आहेत.
हे उघड उघड सत्य असताना सुद्धा आपल्याकडील काही मंडळी महिषासुर, महाबली यांना बिनदिक्कतपणे बहुजन म्हणून आपल्याकडील संघर्ष हा बहुजन आणि सवर्ण संघर्ष आहे असे तद्दन खोटे प्रसृत करतात. सामान्य माणसाला ही वंशावली माहित असण्याचे कारण नाही त्यामुळे त्यांना भ्रमित करणे सोपे जाते.
कारण सत्य हे आहे कि कम्युनिस्ट लोकांना या देशातील तमाम पुराणांना वर्ग संघर्ष या व्याख्येत बसवायचे आहे. त्यामुळे असत्य असूनही तसा भ्रम निर्माण केला जातो आहे. ब्रिटीश शिक्षण घेऊन तयार झालेल्या सरकारी विचार वंतांना आपल्या देशातील तमाम प्रतीके ही जातीच्या आणि वर्णव्यवस्थेतील चौकटीत बसवायची आस आहे.
सगळ्यांचे उद्दिष्ट समान आहे. सत्य सनातन वैदिक धर्माचा पाया आहे न्याय , सत्य आणि नितीमत्ता. याचे पालन करणारा कोणत्याही वर्णाचा असेल , जातीचा असेल, स्त्री असेल , पुरुष असेल कोणीही असेल तरीही तो वंदनीय आहे आणि त्याचे गुण आपल्या संस्कृतीने गायले आहेत. त्याला ईश्वरसमान स्थान दिले आहे. ब्राह्मणांनी आपल्या उपासना मार्गात त्याला उपास्य बनवून, त्याची उपासना पद्धती हजारो वर्ष लोकांना प्रदान केली आहे.
अन्यायी अत्याचारी ब्राह्मण असला तरीही ब्राह्मण त्याचे कौतुक, भलामण करत नाहीत. कारण आपल्या संस्कृतीमध्ये हा स्वार्थी विचार नाहीच. पण या कम्युनिस्ट लोकाना व अर्बन नक्षल वाद्यांना जातीची , वर्णाची, स्त्रीवरील अन्यायाची गणिते मांडून ओकारी येईतो पैसा खायचा आहे, त्याना सत्ता बळकवायची आहे, त्याना हिंदू धर्माचा पाया विसविशीत करून आपल्याला पोसणाऱ्या धर्माच्या साठी भुसभुशीत जमीन तयार करायची आहे.
असे सर्व नीच, हलकट, पाताळयंत्री हिंदू धर्माचे, संपूर्ण समाजाचे आणि राष्ट्राचे शत्रू असणारे लोक या तमाम पूर्वकाळातील राक्षसांचे वंशज होऊन आपल्या समाजाची आज हानी करण्याचे स्वप्न पहात आहेत. यांचे हे षड्यंत्र समजून घ्या.
दुर्गा सप्तशती मध्ये सांगितलेले राक्षसांचे मायावी युद्ध हे आहे. हा तो छद्मयुद्ध भाग आहे ज्याचा वापर करून ते सामान्य लोकांना भ्रमित करणार आहेत. आपल्या एकसंध राष्ट्र , धर्म आणि समाजात फुट पाडणार आहेत.
सामान्य हिंदू हा पापभिरू असतो. शूर असला तरी भोळसट असतो. त्याचा बुद्धिभेद करणे सोपे आहे. आणि हा बुद्धिभेद गेली २०० वर्ष अधिक ताकदीने केला गेला आहे कारण गेली २०० वर्ष या उपद्व्यापांना ब्रिटीशांचे आणि स्वातंत्र्याच्या नंतर आपल्या देशातील काळ्या इंग्रजांचे समर्थन, राजाश्रय आणि आर्थिक सहाय्य होते.
याचाच परिणाम म्हणून सर्वधर्मसमभाव नावाचा पराकोटीचा विकृत विचार आपल्या मेंदूमध्ये भिनावण्यात ही मंडळी यशस्वी झाली आहेत.आता जागे व्हा… दुर्गेचे स्मरण करा. चामुंडेची आणि महाकालीची उपासना करा आणि या नराधमांनी आणि मानवतेच्या शत्रूंनी निर्माण केलेले हे षड्यंत्राचे जाळे उध्वस्त करून परत एकदा स्वधर्माची पहाट उगवली पाहिजे. ती सुद्धा केवळ भारतभूमीवर नव्हे तर संपूर्ण विश्वात आता सत्य सनातन वैदिक धर्माचा विचार संपूर्ण जगात स्थिर करणे, शक्तिशाली करणे हे आपले कर्तव्य आहे.
महिषासुर, रावण आणि या परंपरेतील कोणत्याही राक्षसाचे कौतुक करणारे केवळ हिंदू धर्माचे शत्रू नसून अखिल मानवतेचे शत्रू आहेत आणि त्यांचे मतपरिवर्तन किंवा त्यांचा समूळ नाश हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे हाच विजयादशमी च्या निमित्ताने आई भगवतीने आपल्याला दिलेला संदेश आहे. याचे पालन करणे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
लेखक: सुजीत भोगले
==== + ====